नागपूर विद्यापीठात ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि साहित्य दृष्टी’वर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

विद्यापीठ हिंदी विभागात १२-१३ सप्टेंबरला आयोजन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागात ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि साहित्य दृष्टी’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि शिक्षण, संस्कृती उत्थान न्यास नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी विभागात गुरुवार, दिनांक १२ व शुक्रवार १३ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे.

राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी, शिक्षण, संस्कृती उत्थान न्यासच्या राष्ट्रीय संयोजक महिला कार्य प्रभारी शोभाताई पैठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये अमृत काळात भारतीय ज्ञान परंपरेची प्रासंगिकता, भारतीय ज्ञान परंपरेची जागतिक दृष्टी, भारतीय साहित्य सिद्धांताचे मुख्य घटक – आधुनिक संदर्भ, युरोपियन विद्वानवाद आणि भारतीय ज्ञान परंपरा, भक्ती तत्वज्ञानाची भारतीय परंपरा, साहित्यावर आधुनिक भारतीय विचारवंतांचा प्रभाव, भारतीय साहित्यिक सिद्धांतातील पर्यावरणीय चेतना, भारतीय साहित्याची भावी दिशा, भारतीय ज्ञान परंपरेत मानसिक आरोग्य, भारतीय ज्ञान परंपरेचे स्वरूप, विचार आणि क्रमिक विकास, आधुनिक हिंदी साहित्यातील भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय ज्ञान परंपरा- चरित्र निर्माण, भारतीय ज्ञान, विज्ञान आणि वैदिक ऋषी, भारतीय परंपरेतील सौंदर्यशास्त्र आणि कला दृष्टी आदी विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

Advertisement

राष्ट्रीय परिषदेला शिक्षण संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव डॉ अतुल कोठारी, प्रख्यात विचारवंत रामेश्वर मिश्र पंकज, पंजाब विद्यापीठ चंदिगडचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ सुधीर कुमार, माजी पोलीस महानिरीक्षक डॉ भूषण कुमार उपाध्याय, एसएनडीटी मुंबई येथील डॉ जितेंद्र तिवारी, डॉ हरिसिंग गौर विद्यापीठ सागर येथील तत्वज्ञान विभाग प्रमुख प्रो अंबिका दत्त शर्मा, बिकानेर येथील प्रसिद्ध विचारवंत डॉ नंदकिशोर आचार्य, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी येथील इतिहास विभागाचे माजी प्राध्यापक प्रो सीताराम दुबे, मध्य प्रदेश शासनातील भोपाळ येथील माजी अपर मुख्य सचिव मनोज श्रीवास्तव, भोपाळ येथील प्रसिद्ध विचारवंत डॉ आनंदकुमार सिंह, नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालयातील फेलो डॉ ज्योतिष जोशी, खंडोबा येथील प्रसिद्ध विचारवंत डॉ श्रीराम परिहार, डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ दिल्ली येथील प्रो सत्यकेतू यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

राष्ट्रीय चर्चासत्राचे संयोजक विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ मनोज पांडे तर आयोजन सचिव म्हणून डॉ संतोष गिरहे व्यवस्था पाहत आहे. आयोजन समितीमध्ये डॉ लखेश्वर चंद्रवंशी, डॉ सुमित सिंह, डॉ एकादशी जैतवार, प्रा जागृति सिंह, प्रा दामोदर द्विवेदी कार्य पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page