उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ३० व ३१ जुलै रोजी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेच्या वतीने ३० व ३१ जुलै रोजी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. उदयोन्मुख संशोधक, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी यांच्यात परस्पर संवाद व्हावा या दृष्टीकोनातून हा परिसंवाद होणार आहे. यासाठी संशोधन गोषवारा २५ जुलै पर्यंत directorslskbc@gmail.com या मेलवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थी अथवा संशोधकांसाठी पोस्टर सादरीकरणाचे सत्र देखील होणार आहे. या परिसंवादासाठी उपविषय जे देण्यात आले आहे त्यामध्ये १) प्लॅन्ट बायोकेमेस्ट्री अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी २) मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी अॅण्ड फर्मेंटेंशन टेक्नॉलॉजी ३) मोल्युक्युला बायोलॉजी अॅण्ड बायोकेमिकल इंजिनिअरींग ४) बायोमेडिसीन अॅण्ड नॅचरल प्रोडक्टस ५) एन्झीमि टेक्नॉलॉजी अॅण्ड फॉर्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी आदी विषयांचा समावेश आहे. अशी माहिती प्रशाळेचे संचालक प्रा ए जी इंगळे व संयोजन सचिव प्रा के एस विश्वकर्मा, प्रा बी एल चौधरी यांनी दिली.