शिवाजी विद्यापीठात जागतिक संगीत व योग दिनानिमित्त संगीतसभेचे आयोजन
कोल्हापूर : जागतिक संगीत व योग दिनानिमित्त शुक्रवार, दि २१ जून रोजी शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने ‘योग संगीत’ या संगीतसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘फिजिकल – मेंटल-इमोशन्ल हेल्थ हीच खरी वेल्थ’ अशी संकल्पना घेऊन सादर होणार्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका व योगतज्ञ डॉ भाग्यश्री ज्ञानेश मुळे, प्रसिद्ध हार्मोनियम व सिंथेसायझरवादक डॉ अरुण कुलकर्णी, प्रसिद्ध सतारवादक अजित कुलकर्णी आदी मान्यवर कलाकार सहभागी होत आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्ष कुलगुरू प्रा डॉ डी टी शिर्के व प्रमुख उपस्थिती प्रा डॉ पी एस पाटील व डॉ व्ही एन शिंदे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध आर जे व निवेदक मनिष आपटे हे करणार असून संगीत व नाट्यशास्त्र विभागाचे प्रशांत देसाई संदेश गावांदे, विक्रम परीट साथसंगत करणार आहेत. प्रस्तुत कार्यक्रम संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या सभागृहात शुक्रवार, दि २१ जून रोजी दुपारी ०३:०० वाजता संपन्न होणार असून जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्र आधिविभागप्रमुख डॉ विनोद ठाकूरदेसाई यांनी केले आहे.