महात्मा गांधी मिशन विद्यापीठात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठात मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या चिंतन गाह येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून लेखक प्रा. सुनीलकुमार लवाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या सकाळी ०९:३० वाजता चिंतन गाह येथे मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सुतमाला अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर गायक राहुल खरे आणि प्रा. भक्ति बनवस्कर प्रार्थना आणि भजन सादर करणार आहेत. त्यानंतर प्रा. सुनीलकुमार लवाटे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई हे संदेश देणार आहेत.
सकाळी ११ वाजता हुतात्मा दिनानिमित्त २ मिनिटे मौन पाळून महात्मा गांधी यांच्या स्मृतींना सामूहिकरित्या श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. शांती मंत्राने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
यावेळी, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांना खुला प्रवेश असून मोठ्या संख्येने नागरिकांनी या व्याख्यानास उपस्थित राहावे असे, आवाहन संयोजकांनी केले आहे.