अमरावती विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ के जी देशमुख स्मृतीप्रित्यर्थ ३ सप्टेंबर रोजी व्याख्यानमालेचे आयोजन
लोहारा येथील जवाहरलाल दर्डा इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने व डॉ कमलताई काशीराव देशमुख, नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून प्रथम कुलगुरू डॉ के जी देशमुख व्याख्यानमालेचे आयोजन मंगळवार दि 03 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 1:00 वाजता जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालय, लोहारा, जि यवतमाळ येथे करण्यात आले आहे.
‘शिक्षणाची दिशा’ या विषयावर प्रा सुरेश व्दादशीवार हे व्याख्यान देणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, श्री जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी, यवतमाळचे सचिव किशोर दर्डा, दानदाते डॉ कमलताई देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
व्याख्यानमाला कार्यक्रमाला सर्व नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ अविनाश असनारे, जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एस तत्ववादी यांनी केले आहे.