शिवाजी विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय वेबीनारचे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागामध्ये दि.13 ते 15 फेब्रुवारी रोजी इलेक्ट्रॉनिक वेस्ट अँड सस्टेनेबल डेव्हल्पमेंट या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबीनारचे आयोजन केलेले आहे. तीन दिवसीय वेबीनारचे उद्धाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या वेबीनार करीता डॉ. रानिया लम्पाउ, शैक्षणिक सल्लागार, ग्रीस सरकार ग्रीस, डॉ.सीहम कफाफी, ॲरो संशोधन फाँउंडेशन, न्युझीलंड आणि अशोक नलावडे, आदवीक हायटेक लि. पुणे मार्गदर्शन करणार आहेत.
या वेबीनार सोबतच इलेक्ट्रॉनिक वेस्ट अँड मॅनेजमेंट केंद्राचे उध्द्धाटन इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागामध्ये दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे. ई-कचरा हि भारतातीलच नाही तर जगातील मोठी समस्या पुढे येत आहे आणि त्यापासुन अनेक समस्या निसर्गात अनुभवास येत आहेत आणि येतील. याचे भान ठेवुन सदर केंद्राची निर्मिती आणि वेबीनारचे आयोजन केलेले आहे. अशाप्रकारचे कंेद्र शिवाजी विद्यापीठामध्ये स्थापन होणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. वेबीनारचेे समन्वयक म्हणून डॉ. एम. के. भानारकर, अधिविभागप्रमुख प्रा. डॉ. पी. के. गायकवाड, डॉ. एस.ए. शिंदे, डॉ. पी. ए. कदम, डॉ. एस. एम. मस्के, एम.के. पांढरे व विभागातील सर्व कर्मचारी यांनी आयोजन केले आहे.