अमरावती विद्यापीठाच्यावतीने आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन

आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव (सांस्कृतिक स्पर्धा) प्रवेश अर्ज पाठविण्याबाबत सूचना

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव (सांस्कृतिक स्पर्धा) आयोजित करण्यात येत आहे. या संदर्भात विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने पत्र पाठवून कळविले असून त्यामध्ये पाठवावयाचे प्रवेश अर्ज, प्रवेश शुल्क आदींबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रवेश अर्ज व प्रवेश शुल्क पाठविण्याची अंतीम तिथी 31 ऑगस्ट, 2024 आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास ते स्वीकारण्यात येणार नाहीत.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व आपले प्रवेश अर्ज विहित मुदतीत पाठवावे, असे आवाहन विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यार्थी विकास संचालक यांना 8600285857 / 8855083964 यावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com