एमजीएम रुग्णालयात इंडोसर्ज व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन

छत्रपती संभाजीनागर : एमजीएमच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर गॅस्ट्रोएंटरोलॉजी ॲण्ड मिनीमल ॲक्सेस सर्जरी तसेच असोशिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया यांच्या वतीने दिनांक २७ आणि २८ जुलै २०२४ रोजी इंडोस्कोपी या विषयावर व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

MGM GATE

सुमारे २०० वर्षापुर्वी सुरुवात झालेली शस्त्रक्रिया की ज्यामध्ये पोट फाडून शस्त्रक्रिया करावी लागत असे, ते हळूहळू विकसित होत गेले व ४० वर्षापूर्वी की-होल सर्जरी (लॅप्रोस्कोपी) उदयास आली. ज्यामध्ये पोट फाडून करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया ह्या छोट्या-छोट्या छिद्रांमधून शस्त्रक्रिया केल्या जातात. आता थर्ड जनरेशन सर्जरीचे NOTES (Natural Orifice Transluminal Endoscopic Surgery) शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये पोटाची शस्त्रक्रिया करण्यासाठी की-होल एवढे सुध्दा कट घेण्याची गरज नाही. आपल्या शरीराचे नैसर्गिकद्वारमधून इंडोस्कोपीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे.

अशा प्रकारची अद्ययावत इंडोस्कोपीची शस्त्रक्रिया एमजीएम रुग्णालयात गेल्या ९ वर्षांपासून यशस्वीरित्या केली जात आहे. या अत्याधूनिक व कौशल्यपूर्ण शस्त्रक्रियेचा प्रचार व प्रसार व्हावा व तसेच जास्तीत – जास्त सर्जन्स कुशाग्र व्हावेत, या हेतूने एमजीएम सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर गॅस्ट्रोएंटरोलॉजी ॲण्ड मिनीमल ॲक्सेस सर्जरीच्या वतीने २ दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा व व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.

Advertisement

या कार्यशाळेत सर्व किचकट व कौशल्यपूर्ण शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार असून इंडोस्कोपीने केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेवर व्याख्याने व समूह विचारमंथनातून देशभरातील सूमारे २५०-३०० सर्जन्सचे प्रशिक्षण होणार आहे. तसेच या नंतर २ दिवस काही ठराविक सर्जन्सला वेट लॅबवर हॅन्डस ऑन ट्रेनिंग सुध्दा आयोजित करण्यात आले आहे. जेणेकरुन नवीन अनूभव नसलेल्या सर्जनलाही या कार्यशाळेचा फायदा होईल.

या कार्यशाळेत भारतातील १५ नामांकित सर्जन इंडोस्कोपीस्ट मार्गदर्शन करणार आहेत. तसेच एएसआयचे अध्यक्ष डॉ प्रबोल नियोगी, माजी अध्यक्ष डॉ संजय जैन, डॉ शिवकांत मीश्रा हे सुध्दा सहभागी होणार आहेत. अशा प्रकारची अनोखी फक्त सर्जन्सला समर्पित कार्यशाळा एएसआयच्या मार्गदर्शनासाठी भारतात दुसऱ्यांदा होत आहे. एएसआयच्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये या अत्याधूनिक शस्त्रक्रियेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरापासून २०२३ मध्ये सुरुवात झाली आहे. ही आपल्या छत्रपती संभाजीनगरसाठी फार अभिमानानास्पद बाब आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन एएसआयचे अध्यक्ष डॉ प्रबोल नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दिनांक २७ जुलै २०२४ रोजी दुपारी ०४:०० वाजता एमजीएम रुग्णालयाच्या द्योतन सभागृहामध्ये पार पडणार आहे. या सोहळ्यास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे संयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page