कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात सरलमानक संस्कृत कार्यशाळेचे आयोजन

रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे विस्तार सेवा मंडळ व्याकरण विभाग व ज्योतिष विभाग आणि भारतीय भाषा समिती, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 10.02.2024 रोजी एक दिवसीय सरलमानकसंस्कृत कार्यशाला आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारोहाचे अध्यक्षस्थान कार्यक्रमाचे अध्यक्ष, कुलगुरू आचार्य हराराम त्रिपाठी भूषवणार आहेत. मा. कुलसचिव, आचार्य कृष्णकुमार पाण्डेय व प्रो. हरेकृष्ण अगस्ती, समन्वयक, शैक्षणिक परिसर, रामटेक विशेषत्वाने उपस्थित राहतील. ही कार्यशाळा सकाळी 10.30 ते 5.30 पर्यंत राहील.

या कार्यशाळेत कौशल किशोर तिवारी, उत्तरक्षेत्र शिक्षणप्रमुख, संस्कृत भारती तसेच डॉ. सोमसी लक्ष्मी सीताराम शर्मा, सहायक प्राध्यापक, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, तिरूपती हे मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com