एमजीएम विद्यापीठात सिने कलाकार सचिन व सुप्रिया पिळगावकर यांच्या संवाद सत्राचे आयोजन 

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने ज्येष्ठ दिग्दर्शक व सिने कलाकार सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे शनिवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

Organized an interaction session with cinema artists Sachin and Supriya Pilgaonkar at MGM University

यावेळी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर व सर्व संबंधित उपस्थित असणार आहेत. या संवाद सत्रास सर्वांना खुला प्रवेश असून विद्यार्थ्यांसह कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने या उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com