शिवाजी विद्यापीठात “यू-ट्यूब चॅनेल निर्माण व रोजगार”वर मंगळवारी कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाच्यावतीने यूट्यूब चॅनेल निर्माण व रोजगार या विषयावर मंगळवारी व बुधवारी दोन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन वि स खांडेकर भवन येथे करण्यात आल्याची माहिती हिंदी अधिविभागाच्या प्र प्रमुख डॉ तृप्ति करेकट्टी यांनी दिली.

केंद्र शासनाच्या पीएम उषा योजनेंतर्गत आयोजित या कार्यशाळेचे उदघाटन कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेत यूट्यूब सिल्वर प्ले विजेता विष्णू वजार्डे, माध्यम तज्ज्ञ-विश्लेषक डॉ शिवाजी जाधव, समाज माध्यम तज्ज्ञ डॉ आलोक जत्राटकर, फिल्म परीक्षक व समीक्षक डॉ अनमोल कोठाडिया, व्हिडीओ इडिटर डॉ सुषमा चौगले, डॉ अक्षय भोसले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.