अमरावती विद्यापीठात ९ ऑगस्ट रोजी विशेष सेमिनारचे आयोजन
‘विदर्भातील प्रादेशिक असमतोल : स्वरुप, आव्हाने आणि उपाय’ या विषयावर
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्र व विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी १०:०० ते ०५:०० दरम्यान विद्यापीठ परिसरातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्या सभागृहात ‘विदर्भातील प्रादेशिक असमतोल : स्वरुप, आव्हाने आणि उपाय’ या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
या सेमिनारमध्ये ‘विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्या आणि शेतीसमोरील आव्हाने’, ‘दरडोई सकल जिल्हा उत्पन्न आणि विकास’, ‘शैक्षणिक आणि आरोग्याची पायाभूत सुविधा’, ‘जलसिंचनाची सध्यस्थिती आणि अनुशेष’, ‘विदर्भातील उद्योगाची स्थिती आणि आव्हाने’, ‘विदर्भातील रोजगाराचे प्रश्न आणि उपाय’, ‘समन्यायी विकास आणि विकासाचे वाद प्रश्न’, ‘महाराष्ट्राचा असमतोल विकास, संदर्भ विदर्भ प्रदेश’, ‘प्रादेशिक असमतोल आणि विषमता’, ‘दारिद्रय, असमानता आणि विकास’, ‘सामाजिक सुरक्षितता आणि प्रादेशिक विकास’, ‘जिल्हानिहाय विकासाची प्रवृत्ती’, ‘औद्योगिक विकास, असंतुलन आणि अडथळे’, ‘विकासाचे मूलभूत प्रश्न आणि भविष्याची व्यूहरचना’ या उपविषयावर उहापोह होणार आहे.
विद्यार्थी, शिक्षक तसेच संशोधनकर्त्यानी https://forms.gle/E87Hnp38cd2sDcak8 या लिंकवर आपली नोंदणी करावी. अधिक माहितीकरीता सेमिनारचे संयोजक तथा डॉ पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्राचे समन्वयक डॉ महेंद्र मेटे यांच्याशी ९४२१७३९९९६ व विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे सचिव डॉ संजय कोठारी यांचेशी ९१५८३६६४६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी केले आहे.