एमजीएममध्ये ‘मिथक समजुन घेताना’ विषयावरील चर्चासत्राचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संस्था आणि वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिथक समजुन घेताना’ या विषयावरील चर्चासत्र बुधवार, दिनांक ७ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता रुक्मिणी सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे. मिथक शास्त्राचे अभ्यासक डॉ अशोक राणा यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे. डॉ अशोक राणा हे ज्येष्ठ विचारवंत असून आतापर्यंत त्यांनी १०२ पुस्तकांचे लिखाण केलेले आहे.

Advertisement

या कार्यक्रमास एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित असणार आहेत. या चर्चासत्रात पुरातत्वशास्त्राचे प्रा आशुतोष पाटील हे डॉ अशोक राणा यांच्याशी प्रश्नोत्तरे स्वरुपात संवाद साधणार असून मंचावर विविध विद्याशाखांमधील निवडक विद्यार्थी प्रश्नोत्तरे करण्यास उपस्थित असतील. प्रश्नोत्तरे स्वरुपात हा कार्यक्रम होणार आहे.

मिथकशास्त्र हा एक महत्वाचा पण दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. आपण आपले दैनंदिन जीवन जगत असताना मिथकांचा संदर्भ देत प्रत्येकजण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळत असतो. पण ते नेमके काय आहे? हे समजुन घेणेदेखील आवश्यक असल्याने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ रेखा शेळके यानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page