विवेकानंद महाविद्यालयात ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना’निमित्त शालेय स्तरावर समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त दिनांक १३/०९/२०२४ रोजी शालेय स्तरावर समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन सकाळी ०८:०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे.
प्रथम बक्षिस : रुपये ३०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
व्दितीय बक्षिस : रुपये २०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय बक्षिस : रुपये १०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ २ बक्षिसे: रुपये ५००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रत्येकी
या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रा आनंद पाटील-संगीत विभागप्रमुख, (मोबाईल-८२७५३२५७२३) प्रा गणेश दळे, पर्यवेक्षक (मोबाईल-८५५२९१५२५२) तसेच अधिक माहितीकरिता यांना संपर्क साधावे.
या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शाळेने आपला संघ पाठवून या स्पर्धेत सहभागी व्हावे असे प्राचार्य डॉ डी आर शेंगुळे यांनी आवाहन केले आहे.