उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यापीठस्तरीय कुलगुरु उन्हाळी शिबीराचे (सृष्टी सवंर्धन-२०२४) आयोजन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि १ ते ७ जुलै या कालावधीत विद्यापीठस्तरीय कुलगुरु उन्हाळी शिबीराचे (सृष्टी सवंर्धन-२०२४) आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील २०० रासेयो स्वयंसेवक यामध्ये सहभागी होणार आहेत. या शिबीरात जलसंवर्धन नियोजन, आरोग्य मित्र तयार करणे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार रासेयो स्वयंसेवकांमध्ये कौशल्ये विकसित करणे, बंधारे तयार करणे, वन्यजीव संवर्धन, जैवविविधता, जलसंधारण, प्लास्टिक मुक्ती, डीजीटल साक्षरता हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाया विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासदंर्भात तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान होणार आहे.
सोमवार दि १ जुलै रोजी जळगावचे उपवनसंरक्षक इंजी प्रवीण ए यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन होणार आहे. कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी अध्यक्ष राहणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे उपस्थित राहतील. याशिवाय व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड अमोल पाटील, नितीन झाल्टे, अधिसभा सदस्य प्रा संदीप नेरकर, प्रा विशाल पराते, स्वप्नाली काळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दि २ जुलै रोजी केंद्रशासनाचे प्रतिनिधी क्षेत्रीय संचालक अजय शिंदे हे माय भारत पोर्टल या विषयावर संवाद साधतील.
दि ३ जुलै रोजी वृक्ष दिंडी काढुन वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अशी माहिती रासेयो संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी दिली.