कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटतर्फे रतनगड ट्रेकिंगचे यशस्वी आयोजन

राहुरी : राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांमध्ये साहस, धैर्य, एकता आणि शिस्त हे गुण विकसित करण्यासाठी डॉ अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटकडून रतनगड ट्रेकिंगच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या रतनगड ट्रेकिंग मोहिमेसाठी नहात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी जी पाटील, अहमदनगर येथील १७ बटालियन एनस्रीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरबक्ष व अधिष्ठाता डॉ दिलीप पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

रतनगड ट्रेकिंग मोहिमेसाठी २५ छात्र, पाच अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला, छात्रांमध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. छात्र हे कृषि विद्यापीठांमध्ये असल्यामुळे त्यांना निसर्ग जैवविविधता, प्राणी आणि विविध वनस्पती जवळून बघण्याची आणि निरीक्षणाची संधी या मोहिमेदरम्यान लाभली. यामुळे छात्रांमध्ये निसर्ग प्रेम व पर्यावरण याविषयी जाणीव व जागृती निर्माण झाली. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे युनिट हे सप्टेंबर १९८२ पासून १७ महाराष्ट्र एनसीसी बटालियन, अहमदनगर यांच्या अंतर्गत कार्यरत आहे. मागच्या पाच वर्षापासून चार एनसीसी कैडेट्स सर्विस सेलेक्शन बोर्ड क्रॅक करून सेनेमध्ये अधिकारी पदावर रुजू झालेले आहेत.

Advertisement

त्यामध्ये सब लेफ्टनंट वरद शिंदे, सब लेफ्टनंट महेश वाबळे, लेफ्टनंट सिद्धेश भालेराव आणि लेफ्टनंट बालाजी पवार ही आहेत आणि एकूण १७ अधिकारी सैन्यामध्ये विविध पदावर कार्यरत आहेत. तसेच या युनिटतर्फे महात्मा फुले कृषि विद्यापीठांच्या मागील चार कुलगुरू यांना मानद कर्नल पदवी प्रदान करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी चार इन्वेस्टीचर कार्यक्रम या विद्यापीठांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये आतापर्यंत १३ CATC कैम्प व चार थल सैनिक कॅम्प है कॅम्पसमध्ये आयोजित केलेले आहेत. महाविद्यालयाने विद्याथ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता व सैन्यामध्ये अधिकारी पदावर जाण्यासाठी महाविद्यालयात सर्विस सेलेक्शन बोर्ड आणि व्यक्तिमत्व विकास घावर विविध कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे.

मागील वर्षापासून ट्रेकिंगचे आयोजन सुद्धा करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी सुद्धा रतनगड ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आलेले होते. डॉ दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रतनगड ट्रेकिंगचे आयोजन हे लेफ्ट सुनील फुलसावंगे, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी डॉ प्रणव पावसे, डॉ हिमालया गणाचारी यांनी केले. महाविद्यालयाचे कार्यकारी परिषदेचे विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ सचिन नलावडे, डॉ कैलास कांबळे, डॉ विक्रम कड, डॉ एस बी गडगे, डॉ व्ही एन बारई, वैभव बारटक्के यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page