‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन
३१ जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालये नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विद्यापीठाच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
त्या अनुषंगाने विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या आयोजना बाबत दि ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी युवक महोत्सवाच्या आयोजना बाबतचे आपले प्रस्ताव दि ३१ जुलै पर्यंत विद्यार्थी विकास विभागाकडे सादर करावेत. असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव यांनी केले आहे.