देवगिरी महाविद्यालयात “आई मेळाव्याचे” आयोजन
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय येथे विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी/ मातांसाठी आई मेळाव्याचे आयोजन दि ४ सप्टेंबर २०२४ बुधवार रोजी दुपारी ०२:०० वा महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात करण्यात आले आहे. या आई मेळाव्यासाठी समाजसेविका, सुप्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट डॉ रश्मी बोरीकर विद्यार्थ्यांच्या आई बरोबर “आकाशी झेप घे रे पाखरा” या विषयावर हितगुज साधणार आहेत.

आई मेळाव्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांची मानसिकता, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी करावी लागणारी जीवघेणी मेहनत, त्यांच्यावर येणारा मानसिक ताणतणाव, आई-वडिलांनी या काळात घ्यावयाची जबाबदारी, विद्यार्थ्यांचे नैराश्य आणि पालकांची भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे आई मेळावा घेणारे “आई मेळावा” कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध डॉ अंजली काळे (विभागप्रमुख – एम जी एम मेडीकल कॉलेज) भूषविणार असून या मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांच्या आईंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन. प्राचार्य डॉ अशोक तेजनकर संयोजक उपप्राचार्य प्रा एन जी गायकवाड, उपप्राचार्य प्रा सुरेश लिपाने, उपप्राचार्य प्रा विजय नलावडे यांनी केले आहे.