उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी व पदवीका प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डिसेंबर २०२३ व एप्रिल / मे २०२४ मध्ये व त्यापुर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसचे ज्या विद्यार्थ्यांना विद्यावाचास्पती (पीएच डी) घोषीत झालेली आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांकडून पदवी व पदवीका प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. यामधील पात्र विद्यार्थ्यांना तेहतीसावा दीक्षांत समारंभामध्ये पदवी आणि पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
यावर्षीच्या ३३ व्या दीक्षांत समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी / पदविका प्रमाणपत्रे घ्यावयाची आहेत अशा विद्यार्थ्यांनी पदवी /पदविका प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज भरावयाचे असून त्यांची लिंक विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होम पेजवरील स्टूडंट कॉर्नर (Sutdent Corner-Conovation -33rd Convocation ceremony) या लिंकवर जाऊन आवश्यक ती माहिती भरावी.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या अंतीम वर्षत प्रवेशित अर्थात माहे एप्रिल / मे / जुन २०२४ (परीक्षा अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राचे शुल्क भरलेले विद्यार्थी) तसेच यापुर्वीच्या परीक्षेत उत्तीर्ण व विद्यावाचास्पती (पीएच डी) धारक विद्यार्थ्यांसाठी पदवी / पदवीका प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा विहीत कालावधी विनाविलंब शुल्कासह ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी दि १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आहे.
पदवी प्रमाणपत्र शुल्क (उत्तीर्ण झाल्यापासुन पाच वर्षाच्या आत) रु ५०० (विलंब शुल्क अतिरिक्त १०० रु) पदवी प्रमाणपत्र शुल्क (उत्तीर्ण झाल्यापासुन पाच वर्षापासून अधिक कालावधीसाठी) रु १३०० एवढे असुन विहीत शुल्क क्रेडीट कार्ड / डेबीट कार्ड / नेट बँकीग / तसेच युपीआय द्वारेच शुल्क भरता येईल. अशी माहीती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा योगेश पाटील यांनी दिली.