एमजीएम विद्यापीठात कायदे विषयक एकदिवसीय परिसंवाद यशस्वीपणे संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिगल स्टडीज अँड रिसर्च आणि एमजीएम वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक्सप्लोरिंग दि क्रिमिनल लॉ अँड मिडिया : ए फोकस ऑन थ्री क्रिमीनल लॉ’ या विषयावरील परिसंवादाचे विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते.
या परिसंवादाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही के जाधव, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड वसंत साळुंके, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, संचालिका डॉ झरताब अंसारी, कार्यक्रम समन्वयक ऍड रिना मानधनी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
या परिसंवादाच्या उद्घाटनपर सत्रात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही के जाधव, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड वसंत साळुंके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पहिल्या सत्रामध्ये ‘दि भारतीय न्याय संहिता, २०२३’ या विषयावर डॉ आनंद देशमुख, दुसऱ्या सत्रामध्ये ‘दि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३’ या विषयावर प्रा डॉ हकीम, तिसऱ्या सत्रामध्ये ‘दि भारतीय साक्ष अधिनियम, २०२३’ या विषयावर ऍड जी के नाईक ठिगळे तर चौथ्या सत्रामध्ये ‘मिडिया पर्स्पेक्टिव्ह ऑन थ्री किमिनल लॉ’ या विषयावर ऍड.चैतन्य धारूरकर यांनी आपले विचार मांडले.
या परिसंवादाचा समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून कायदेतज्ञ निरूपमा प्रताप हरदास आणि उच्च न्यायालयातील वकील ऍड एस के कदम हे उपस्थित होते. या कार्यक्रमात पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रा आशा देशपांडे यांनी मानले.