गोंडवाना विद्यापीठात एकदिवसीय व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक उपयोजित अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था : संधी व आव्हाने या विषयावर एक दिवसीय व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्रमुख वक्ता म्हणून सहयोगी प्राध्यापक, पदव्युत्तर शैक्षणिक अर्थशास्त्र विभाग, रा. तु. म. विद्यापीठ, नागपूर डॉ. समित माहोरे, प्रमुख उपस्थिती म्हणून अधिष्ठाता मानवविज्ञान विद्याशाखा, डॉ. चंद्रमौली, समन्वयक उपयोजित अर्थशास्त्र विभाग, डॉ. शिल्पा आठवले उपस्थित होते. वक्ते डॉ. सुमित माहोरे यांनी महाराष्ट्र राज्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार एक ट्रिलीयन डॉलर इतका करावा असे ध्येय निश्चित केलेले आहे. हे ध्येय पूर्ण कसे करता येईल याची शास्त्रशुद्ध चिकित्सा त्यांनी केली. तसेच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर झाल्यास उपलब्ध संधींची चर्चाही त्यांनी केली.
कार्यक्रमाचे संचालन स. प्रा. पदव्युत्तर शैक्षणिक उपयोजित अर्थशास्त्र विभाग,डॉ. धैर्यशील खामकर, प्रास्ताविक स. प्रा.डॉ. अनंता गावंडे, प्रमुख वक्त्यांचा परिचय स. प्रा. डॉ. महिंद्र वर्धलवार, कार्यक्रमाविषयी मनोगत स. प्रा. वाणिज्य विभाग, डॉ. अनिरूध्द गचके, आभार स. प्रा.डॉ. सुरेखा हजारे यांनी मानले. या कार्यक्रमाचा लाभ सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतला.