शिवाजी विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे ‘लियर’ या एकांकिकेचे सादरीकरण

कोल्हापूर : बेळगाव येथील कॅपिटल वन या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेत संगीत व नाट्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी दि. ०३ फेब्रुवारी २०२४ रोजी जयंत पवार लिखित ‘लियर’ या एकांकिकेचे सादरीकरण केले. या स्पर्धेत उत्कृष्ट पार्श्वसंगीताचे पारितोषिक एम. ए. नाट्यशास्त्र भाग दोनच विद्यार्थी सिद्धांत खांडेकर याला मिळाले तर स्त्री अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक नाट्यशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची विद्यार्थीनी ऋतुजा बडवे हिला मिळाले.

 या एकांकिकेचे दिग्दर्शन विभागाचे माजी विद्यार्थी प्रशांत नागावकर यांनी केले. विभागाचे शिक्षक युवराज केळुसकर, विकास कांबळे व राज पाटील यांनी मार्गदर्शन केले. विभागाचे विभागप्रमुख डॉ. निखिल भगत, डॉ. विनोद ठाकुरदेसाई, डॉ.संजय तोडकर, डॉ. राजश्री खटावकर आदी शिक्षकांचे  विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com