आंतर विद्यापीठ ज्युडो स्पर्धेत ओम हेमगीरयांना कास्यपदक
नांदेड : एल.एन.सी.टी विद्यापीठ भोपाळ येथे सुरू असलेल्या पश्चिम दक्षिण विभागीय आंतर विद्यापीठ ज्युडो क्रीडा स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुलांचा संघाने सहभाग झाला आहे. ६० किलो वजन गटांमध्ये ओम हेमगीर या खेळाडू विद्यार्थ्याने विद्यापीठास कास्यपदक मिळवून दिले आहे. या खेळाडू विद्यार्थ्यांना डॉ. राहुल कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. विठ्ठल डुमनर हे सहभागी झाले होते.

या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी खेळाडू संघ, मार्गदर्शक व व्यवस्थापक यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.