आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘नशामुक्त भारत अभियान’ उपक्रमांतर्गत शपथ
नशामुक्त पिढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे – लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘नशामुक्त भारत अभियान’ उपक्रमांतर्गत शपथ घेण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन व्ही कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, देश नशामुक्त होणे ही काळाची गरज आहे. यासाठी सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, युवक, युवती यांच्यात जागरुकता निर्माण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, मादक पदार्थांच्या गैरवापरास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने आदेशित केल्यानुसार नशामुक्त भारत बनवण्याच्या दृष्टीकोनातून ‘विकसित भारत का मंत्र, भारत हो नशेसे स्वतंत्र’ या संकल्पनेनुसार नशामुक्त भारत अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून व्यसनाधीनतेच्या विरोधात सजगता निर्माण करणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी ‘नशामुक्त भारत अभियानाच्या’ प्रतिज्ञेचे वाचन केले. यावेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी नशामुक्त भारत अभियानाची शपथ घेतली. याप्रसंगी डॉ मृणाल पाटील, संजय मराठे, वाय जी पाटील, महेश बिरारीस, लक्ष्मीछाया जाहगिरदार, डॉ सुप्रिया पालवे, सुवर्णा खैरनार, हेमंत भावसार, प्रशांत पवार, विजय सोनवणे, जितेंद्र शिरसाठ, प्रल्हाद सेलमोकर, प्रविण सोनार, समाधान जाधव अविनाश सोनवणे, अर्जुन नागलोत, आबाजी शिंदे, राहूल विभांडीक, विनायक ढोले, विकास हांडोरे, सुरेश शिंदे, नितीन तायडे, रोशन चक्रवर्ती, पुष्कर तÚहाळ, कृष्णा भवर, दिलीप राजपूत, दिलीप दोडे आदी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.