अमरावती विद्यापीठातील उन्नत भारत अभियान अंतर्गत दत्तक गांव बोरगांव धर्माळे येथे पोषण जागरुकता कार्यक्रम साजरा

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील उन्नत भारत अभियान अंतर्गत दत्तक गांव बोरगांव धर्माळे येथे पोषण जागरूकता कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांनी अन्नातील पोषणमूल्यांचे महत्त्व, पोषक घटक याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पथनाट्यव्दारे जनजागृती करुन पोषणाचे महत्व सांगितले. उपसरपंच जोगेंद्र मोहोड यांनी उन्नत भारत अभियान योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याचे आश्वासन दिले. माजी सरपंच अरून धर्माळे यांनीही गावातील कामांची विस्तृत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी गावात घरोघरी जावून सर्वेक्षणही केले.

Advertisement

सदर कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, समन्वयक डॉ. यादवकुमार मावळे, बोरगांव धर्माळे ग्रामपंचायतचे कर्मचारी शुभम भालेराव, समस्त गावक-यांच्या सक्रीय पुढाकारामुळे यशस्वीरित्या पार पडला. समन्वयक डॉ. मनोज कुंंभारे यांनी प्रास्तविकातून केंद्र शासनाच्या उन्नत भारत अभियानाच्या या महत्वकांक्षी योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली व ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन विद्यार्थीनी श्रद्धा गणवीर, आभार अनिकेत हजारे या विद्यार्थ्यांने मानले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page