नर्सरीत शिकणाऱ्या बालगोपाळांनी दिली एमजीएम विद्यापीठास भेट
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनच्या (एलएसओडी) आकर्षक वास्तूमध्ये क्रेऑन किड्स नर्सरी स्कूलच्या बालगोपाळांचा किलबिलाट विद्यार्थी, प्राध्यापकांचे लक्ष वेधून घेत होता. या शाळेच्या व्यवस्थापनाने या बालगोपाळांची एलएसओडीमध्ये सहल आयोजित केली होती.
बालवाडीतील चाळीस मुले आणि त्यांच्या शिक्षकांनी या सहलीत सहभाग घेऊन एलएसओडीमधील विविध मांडणी कुतुहलाने पाहिली. सर्व बालगोपाळ प्रामुख्याने पॉटरी मेकींगच्या विभागात सर्वाधिक रमली. तिथे त्यांना प्राध्यापक माखनलाल विश्वकर्मा यांनी पॉटरी मेकींगचे प्राथमिक धडे दिले.
संस्थेतील प्रिंट मेकींग लॅबमध्ये प्रा सचिन कांबळे यांनी या बालगोपाळांशी संवाद साधला. मुख्याध्यापक पल्लवी नरवडे आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी एलएसओडीच्या या भेटीचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला.