एमजीएम विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर यशस्वीपणे संपन्न 

‘नॉट मी बट यु’चा संदेश देत स्वयंसेवकांनी केली गांधेली परिसराची स्वच्छता

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) सात दिवसीय निवासी शिबिर गांधेली येथे यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या शिबिरामध्ये जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ.जी.वाय.पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, ईन्स्ट्यिुट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी इ. महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिराचा समारोप एमजीएम रुग्णालय व महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ प्रविण सूर्यवंशी यांच्या व्याख्यानाने झाला.

यावेळी, एमजीएम हिल्स गांधेलीचे संचालक डॉ के ए धापके, डॉ अण्णासाहेब खेमनर, डॉ नरेंद्रसिंग चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ आर आर देशमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

Advertisement

उद्घाटनपर सत्रात बोलत असताना कुलगुरू डॉ विलास सपकाळ  म्हणाले, आपण या शिबिरात पुढील काही दिवस राहणार असून निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना आपल्याला अनेक गोष्टी शिकण्याची संधी आहे. निसर्ग हा आपला सगळ्यात मोठा शिक्षक आहे. या शिबिरात आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपक्रमात आपण सहभागी होत स्वत:तील कौशल्य यावेळी आपण दाखवू शकता. विशेषत: आपले व्यक्तिमत्व विकसित होण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना महत्वपूर्ण भूमिका निभावित असते.

शिबिरात एमजीएम विद्यापीठातील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी श्रमदानासह व्याख्याने आणि पथनाट्यांद्वारे सामाजिक विषयांवर परिसरातील नागरिकांचे प्रबोधन केले. बंधारा बांधणे, व्यसनमुक्ती, निसर्ग संवर्धन, हुंडाबळी, वृक्षारोपण, मोबाईलचे व्यसन, जलसंधारण, रस्ता सुरक्षा, बालविवाह आदि विषयांवर स्वयंसेवकांनी नागरिकांचे प्रबोधन केले.

सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी आणि देशासाठी कार्यरत राहण्याची प्रेरणा देणारे हे शिबिर होते. विशेषत: खऱ्या अर्थाने ग्रामीण भारत आम्हांला जवळून समजून घेता आला. सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी आम्ही आमच्या परीने कार्यरत राहू, अशा भावना व्यक्त करीत स्वयंसेवकांनी ग्रामस्थांचा निरोप घेतला.

अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, प्रा विशाखा गारखेडकर, प्रा भाग्यश्री घुले, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ जी सी लोमटे, प्रा रविंद्र कोमटे, प्रा वैभव जोशी आदींनी या शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page