सामाजिक सलोख्याच्या प्रतिज्ञाने श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सुरुवात

बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी शिबिराचे उद्घाटन श्री क्षेत्र कपिलधार येथे संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटक म्हणून इन्फंट इंडियाचे संचालक, ज्येष्ठ समाजसेवक दत्ता बारगजे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ध्वजवंदनाने झाले मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी पूजन करण्यात आले.व राष्ट्रगीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

याप्रसंगी श्री बंकटस्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे तर प्रमुख उद्घाटन म्हणून ज्येष्ठ समाजसेवक इन्फंट इंडिया संचालक आनंदग्रामचे दत्ता बारगजे तर व्यासपीठावर पाली ग्रामपंचायत सरपंच संदीप नवले तसेच श्री क्षेत्र कपिलधा देवस्थान पंचकमिटी सदस्य नागेशअप्पा मिटकरी व श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.शिवाजी मोरे कनिष्ठ विभागाचे उप-प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना बीड जिल्हा समन्वयक प्रा ब्रम्हनाथ मेंगडे तसेच राष्ट्रीय सेवा योजना बीड जिल्हा समन्वयक डॉ अरुण दैतकार यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी उद्घाटक दत्ता बारगजे यांनी युवकांमध्ये सामाजिक एकता देशाविषयी प्रेम जागृत करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने केले जाते. आजचे युग डिजिटल युग आहे या डिजिटल साधनाचा वापर आजच्या तरुणांनी योग्य पद्धतीने करावा तसेच कोणताही मेसेज काळजीपूर्वक वाचावा तसेच फॉरवर्ड करण्याच्या आधी आपण कोणालातरी दु:खवत तर नाही ना याचा विचार करूनच डिजिटल माध्यमाचा वापर करावा जास्तीत जास्त सामाजिक सलोखाच कसा चांगला राहील या माध्यमाचा वापर करताना करावा जेणेकरून गरजवंताला मदत करताना आपण एखादा फोटो पाठवला तर त्यातून कोणाला तरी प्रेरणा मिळते की आपणही मदत करावी तसेच पर्यावरण संवर्धन, वृक्ष संवर्धन,श्रम संस्कृती या माध्यमातून आपल्याला शिकता येते.

Advertisement

तसेच आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो त्या दृष्टिकोनातून कायम आपण आपले वर्तन केले पाहिजे आणि मला विश्वास आहे की आजचा तरुण हा अत्यंत विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक विधायक कामामध्ये सक्रिय होताना दिसतो त्याचाच एक भाग आज माझ्यासमोर बसलेले स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी दिसत आहेत असे मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी उप-प्राचार्य डॉ शिवाजी मोरे यांनी देखील आजच्या सामाजिक स्थितीवर मत व्यक्त केले बीड जिल्ह्यातील अनेक नामांकित उल्लेखनीय कामगिरी करणारे व जिल्ह्याचे नाव उंचावणारे असे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या कार्याचा याप्रसंगी उल्लेख केला. काही दृष्ट प्रवृत्ती मुळे जिल्ह्याची बदनामी होईल असे आम्हाला वाटत नाही कारण याच मातीमध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि देशाचे नेतृत्व करणारे युवा निर्माण झालेले आहेत त्यामुळे आत्ताच्या परिस्थिती पाहता युवकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी असे मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले.

तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्याचा याप्रसंगी उल्लेख केला तसेच मा.विकास आमटे, साधनाताई आमटे व प्रकाश आमटे यांच्या आश्रमातील भेटीच्या प्रसंगी व त्या ठिकाणी आलेले अनुभव स्वयंसेवकांसमोर विविध उदाहरणासह प्रस्तुत केले आणि असे अनेक उदाहरणे देता येतील की समाजसेवा करणारे अनेक समाजसेवक महाराष्ट्रात होऊन गेले आहेत त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास तसेच आपला सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होतो या शिबिराचा स्वयंसेवकांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या वैयक्तिक जीवनात फायदा होतो त्यामुळे अशा शिबिरांचे आयोजन केले जाते असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ प्रकाश कोंका यांनी केले तर आभार प्रदर्शन कनिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा राजाभाऊ नागरगोजे यांनी मानले या शिबिर यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ मनोजकुमार नवसे, डॉ शंकर शिवशेट्टे, प्रा रंणजीत आखाडे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक प्राध्यापक यांनी याप्रसंगी परिश्रम घेतले. या शिबिरासाठी कपिलधार येथील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page