‘कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार’साठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रस्ताव मागविले

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा राज्य पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार’ यावर्षी महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दिला जाणार असून त्यासाठी ९ ऑगस्ट २०२४ पर्यंत विद्यापीठाने प्रस्ताव मागविले आहे.

KBCNMU-GATE

गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या वतीने राज्यपातळीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार दिला जातो. रूपये ५१ हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सामाजिक, कृषी, शिक्षण आणि साहित्य हे चार क्षेत्र पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले आहेत. पैकी यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार शिक्षण क्षेत्रासाठी दिला जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणारी व्यक्ती अथवा संस्था ज्यांनी  मूल्याधिष्ठीत शिक्षणसाठी प्रयत्न केले आहेत. तसेच नाविन्यपूर्ण शिक्षणप्रणाली विकसित केली आहे त्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत.

Advertisement

दि ९ ऑगस्ट २०२४ पर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कारासाठी अर्ज असे लिफाफ्यावर नमूद करून ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पत्रपेटी क्र ८०, जळगाव, जिल्हा जळगाव – ४२५ ००१ या पत्त्यावर प्रस्ताव पाठवावेत. पुरस्कारासाठी व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातील असावी. व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचे वय ४० वर्षांपेक्षा कमी नसावे आणि १५ वर्षापेक्षा जास्त काळ त्या क्षेत्रात काम केलेले असावे. संस्था असेल तर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्या संस्थेचे कार्य देखील १५ वर्षापेक्षा अधिक असावे. राज्यपातळीवरील या पुरस्कारासाठीची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आली त्यामध्ये विहीत नमुन्यातील अर्ज, पात्रता, नियमावली देण्यात आली आहे.

तज्ज्ञ निवड समिती कडून प्राप्त प्रस्तावांची छाननी होऊन पुरस्कार जाहीर केले जातील. विशेष परिस्थितीत पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावा व्यतिर‍िक्त इतर योग्य व्यक्ती अथवा संस्थेचा देखील विचार केला जाऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांनी या पुरस्कारासाठी मुदतीच्या आत प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन कुलसचिव डॉ विनोद पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page