आरोग्य विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापरिषदेवर राज्यपाल यांच्याकडून सदस्यांचे नामनिर्देशन

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापरिषदेवर राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्याकडून विविध सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ अधिनियमान्वये अधिसभा व विद्यापरिषदेवर राज्यपाल महोदय यांच्याकडून सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात येते. कुलपती कार्यालयाकडून विद्यापीठाच्या अधिसभेवर सहा व विद्यापरिषदेकरीता आठ सदस्यांचे नुकतेच नामनिर्देशन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या कडून विद्यापीठाच्या अधिसभेवर अहमदनगरचे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊन्डेशन मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुनिल नाथा म्हस्के, मुंबईचे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मोहन अच्युत जोशी, अहमदनगरचे यशवंतराव चव्हाण आणि आर. डी. एफ दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलिमा श्रीपाद राजहंस, संगमनेरचे संगम सेवाभावी ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविन सुंदरलाल चांडक, चांदवडचे के. बी. आबाड होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. अजय ओंकारनाथ दहाड, खेडचे एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य डॉ. मिलिंद मनोहर काळे यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.

Advertisement
muhs-logo

विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर जळगांवचे शासकीय महाविद्यालयाचे डॉ. गिरिष विठ्ठलराव ठाकूर, सांगलीचे वसंतदादा पाटील दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुरेखा यशवंत भेडसगांवकर, आरोग्य विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जळगांवचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. निवृत्ती भगवानदास स्वामी, मुंबईचे वाय. एम. टी. होमिओपॅथी कॉलेजचे प्राध्यापक डॉ. धनाजी बागल, बंगळूरचे सेंट जॉन्स रिसर्च इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठात डॉ. टोनी राज, लातूरचे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रुद्रामणी स्वामी यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या प्रशासन विभागाचे प्रमुख महेंद्र कोठावदे यांनी सांगितले की, नुकतेच राज्यपाल कार्यालयाकडून नामनिर्देशनाचे पत्र प्राप्त झाले आहे. विद्यापीठ अधिसभा व विद्यापरिषदेवर नामनिर्देशन झाल्याबद्दल सर्व सदस्यांचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मनःपुर्वक अभिनंदन केले असल्याचे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page