मंगळाच्या थौमासियन हायलँडमध्ये प्राचीन हवामान बदलाचे नवे पुरावे; IIT मुंबईचा अभ्यास

मुंबई : मंगळ ग्रहावरील हवामान प्राचीन नोआकियन कालखंडात (सुमारे 400 कोटी वर्षांपूर्वी) उष्ण-आर्द्र होते, परंतु हेस्पेरियन कालखंडात (300 कोटी वर्षांपूर्वी) ते शीत आणि हिमाच्छादित बनले, असा निष्कर्ष IIT मुंबईच्या नव्या अभ्यासातून समोर आला आहे.

थौमासिया हायलँड प्रदेशातील 150 हून अधिक दऱ्यांचे हाय-रेझोल्यूशन इमेजेसच्या आधारे विश्लेषण करण्यात आले. विषुववृत्ताजवळील भागात पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या V-आकाराच्या दऱ्या आढळल्या, तर दक्षिणेकडे हिमनद्यांमुळे तयार झालेल्या U-आकाराच्या दऱ्या अधिक दिसल्या.

अभ्यासानुसार मंगळावर सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते, परंतु हवामान थंड होत गेल्याने पाणी बर्फरूपात पृष्ठभागाखाली साठले. प्रा. आलोक पोरवाल यांनी सांगितले की, मंगळावरील हवामानातील हा बदल ग्रहाच्या उत्क्रांतीचे महत्त्वपूर्ण संकेत देतो.

हा अभ्यास Spatio-temporal evolution of the valley networks in the Thaumasia Highlands या शीर्षकाने प्रकाशित झाला असून, नासासह इस्रोच्या मंगळयानाच्या माहितीचा वापर करून संशोधन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com