‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदिश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, शिवराम लुटे, उद्धव हंबर्डे, शिवलिंग पाटील, अरुण इंगोले, केशव कल्याणकर, गोविंदराव हंबर्डे, मोहन किरडे, त्रिंबक आवाड, व्यंकट पांचाळ यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com