अमरावती विद्यापीठात एनईपी – २०२० वर आधारीत एम एस्सी (अप्लॉईड इलेक्ट्रॉनिक्स) अभ्यासक्रम

एनईपी – २०२० वर आधारीत एम एस्सी (अप्लॉईड इलेक्ट्रॉनिक्स) अभ्यासक्रम : अनेक संधी

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत उपयोजित परमाणु विद्युत विभागाद्वारे NEP-2020 वर आधारीत एम एस्सी (अप्लॉईड इलेक्ट्रॉनिक्स) हा व्दिवर्षीय पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरु केला आहे. अभियांत्रिकी विद्याशाखेत अंतर्भूत असलेला या अभ्यासक्रमाला स्नातक पदवीला इलेक्ट्रॉनिक्स/ फिजिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन /कम्प्युटर सायन्स सोबत 10+2 लेव्हल ला गणित किंवा बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लीकेशन किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची समकक्ष पदवी मिळालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. 2023-24 या शैक्षणिक सत्रापासून NEP प्रमाणे Syllabus तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक सत्रात कोअर तसेच प्रोफेशनल इलेक्टिव विषयांचा समाविष्ट करण्यात आले आहेत.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये १२ कोअर विषय, रिसर्च मेथोडॉलॉजी आणि IPR तसेच ०४ नाविन्यपूर्ण व आधुनिक प्रोफेशनल इल्केटीव विषयांच्या स्वतंत्र बास्केट देण्यात आल्या आहेत. प्रत्येक बास्केट मध्ये ०३ विषय असून त्यापैकी कोणताही एक विषय आपल्या आवडी प्रमाणे विद्यार्थी निवडू शकतात. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी १ वर्षानंतर PG Diploma प्राप्त करुन ऐच्छिक Exit ची संधी मिळू शकेल. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मिलींद बारहाते यांच्या प्रेरत नेतृत्व आणि बहुमूल्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांसाठी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

प्रोफेशनल इलेक्टिव्ह विषयावर आधारित प्रात्यक्षिके सुद्धा समाविष्ट करण्यात आली आहेत यामुळे विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रमुख विषय यासोबतच इतर महत्त्वाच्या विषयांवर प्रात्यक्षिके करता येतील. बदलत्या काळाची गरज लक्षात घेता या अभ्यासक्रमांमध्ये अनेक नवनवीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या अभ्यासक्रमामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) हा रिसर्च स्किल एनहांसमेंट कोर्स सुद्धा समाविष्ट करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रमुख विषया सोबतच रिसर्च प्रोजेक्ट, रिमोट सेन्सिंग, स्मार्ट सेन्सर्स, टेक्स्ट माईनिंग,पॅटर्न रेकग्निशन, ईमेज ॲन्ड व्हिडीओ प्रोसेसिंग, ईमेज ॲन्ड स्पिच प्रोसेसिंग, मशिन लर्निंग, जनरेटीव्ह डीप लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना उन्हाळी आणि हिवाळी दीर्घ सुटी मध्ये किमान ६० तासांची इंटर्नशिप/ करणे अनिवार्य आहे व यासाठी विभागाद्वारे आवश्यक मदत करण्यात येते.

या विभागात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन संबंधित विषय व प्रात्यक्षिके अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांद्वारे शिकविले जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता संवाद कौशल्य, गटचर्चा, नेतृत्वगुण आधी क्षमतांचा विकास होण्यासाठी विशेष लक्ष दिल्या जाते. तसेच विद्यार्थ्यांना गेट, सेट, नेट व इतर स्पर्धा परीक्षांकरिता मार्गदर्शन केल्या जाते. या विभागाकडे आधुनिक विषय शिकवण्यासाठी वातानुकूलित प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांना संशोधन व विकास करण्यासाठी तसेच विविध प्रोजेक्ट करण्यासाठी अद्यावत कार्यशाळा उपलब्ध आहे.

Advertisement

M Sc (Applied Electronics) हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी B E (Electronics & Telecommunication) या अभ्यासक्रमामधील ८० टक्के समान विषय शिकतात. हा अभ्यासक्रम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेमध्ये सुरु करण्यात आला होता. तसेच विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी बद्दल प्रशिक्षित करणे हा त्याचा उद्देश आहे. पूर्वी Oracle, Tektronix, Infosys, TCS, Cognizant, Persistent, Scientech, IBM, Marvell, BSNL, Tech Mahindra, Syntel, L&T Infotech, Videocon, CDAC, Samsung, यासह अनेक विद्यार्थ्यांना MNCs मध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच काही विद्यार्थी रोबोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, जिंदाल सॉ लि., इलेक्ट्रॉनिक्स आर्ट प्रायव्हेट लिमिटेड, इ कंपन्या मध्ये नियुक्त झाले आहे.

अनेक विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे पदव्युत्तर तसेच पीएच.डी. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यासारख्या विविध प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यापैकी काही विभाग आणि संस्थांमध्ये अनुक्रमे विभाग प्रमुख आणि प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. इतर काही विद्यार्थ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इक्विटास बँक, कॅनरा बँक इत्यादी बँकिंग क्षेत्रात नियुक्त करण्यात आले आहे. शिवाय, काही विद्यार्थी भारतीय नौदल, मर्चंट नेव्ही, संरक्षण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, बीएसएनएल, इत्यादी ठिकाणी नोकरी करीत असून काही विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे त्यांचे छोटे उद्योग स्थापन केले आहेत आणि आता ते स्वयंरोजगार करत आहेत. तसेच ते इतर विद्यार्थ्यांनाही रोजगार देत आहेत.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर उद्योग क्षेत्रात अभियंते, व्यवस्थापक किंवा सिस्टीम डेव्हलपर्स म्हणून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थी विविध उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील संस्थांमध्ये काम करू शकतात, ज्यात प्रसारण, मागदर्शन, डेटा कम्युनिकेशन, मनोरंजन, संशोधन आणि विकास आणि सिस्टिम सपोर्ट यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत जसे सेवा अभियंता, इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन अभियंता, फील्ड चाचणी अभियंता, कम्युनिकेशन्स अभियंता, ग्राहक समर्थन अभियंता, फील्ड चाचणी अभियंता, नेटवर्क नियोजन अभियंता, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन सल्लागार, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ, संशोधन आणि विकास सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ विक्री व्यवस्थापक, तांत्रिक संचालक, Analog अॅप्लिकेशन इंजिनीअर, टेलिकॉम इंजिनिअर, व्हीएलएसआय आणि एम्बेडेड सिस्टम (ऑटोमेशन) इंडस्ट्रीज, डेटा प्रोसेसिंग इंडस्ट्रीज इत्यादी.

M Sc (Applied Electronics) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता B Sc with (Physics/Chemistry/Mathematics/Computer Science/Electronics Instrumentation) or BCA with Mathematics at 10+2 level Or Bachelor of Computer Science or Equivalent degree of any other statutory University. Minimum 45% marks at B Sc for General (Open) Category, Minimum 40% marks at B Sc for Reserved Category. M Sc अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स विद्यार्थी स्वयं-रोजगार/स्टार्ट-अप/व्यवसाय इत्यादी करू शकतात.

विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करण्याची संधी प्राप्त करावी.

  • डॉ संजय डुडुल,
    प्राध्यापक व विभागप्रमुख,
    पदव्युत्तर उपयोजित परमाणू विद्युत विभाग,
    संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page