B Sc B Ed साठी नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट (NCET) अर्ज 30 एप्रिल पर्यंत भरता येणार
कोल्हापूर : B Sc B Ed (ITEP) साठी नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट (NCET) अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2024 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षणशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठात B Sc B Ed (ITEP) हा एकात्मिक चार वर्षाचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सुरू होत आहे.
बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण किंवा ज्यांनी बारावी विज्ञान शाखेची आत्ताच परीक्षा दिलेली आहे, असे विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट (NCET) देऊन सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२४ असून विभागातील सदर अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉ रुपाली संकपाळ (मो नं ९८६०१६९४२७), व कार्यालीन दूरध्वनी क्र ०२३१-२६०९१८३ यावर संपर्क साधावा असे आव्हान विभाग प्रमुख डॉ चेतना सोनकांबळे यांनी केले आहे.