मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय योग परिषद ‘योग दर्शन 2024’ चा समारोप
चित्त शुद्धीसाठी योग गरजेचा – प्रा शशिकला वंजारी
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘योग दर्शन 2024’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा (दि २4) समारोप झाला. समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू प्रा शशिकला वंजारी, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था (एनआयईपीए), नवी दिल्ली ह्या उपस्थीत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे होते. तसेच डॉ विजय कांची, आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ जयदीप निकम, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ संजीवणी महाले, संचालक डॉ चेतना कामळस्कर, डॉ सजन थुल हे देखील मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ आनंद सुकेणकर यांनी परिषदेचा दोन दिवसाचा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला. तसेच योग तज्ञ डॉ संजय गवळी यांनी पेपर सादरीकरणाबाबत उपस्थितांना माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांनी सादरीकरणाबाबत केलेल्या त्रुटी कशा सुधाराव्यात याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहूण्यांची ओळख डॉ संगिता पाटील यांनी करून दिली.
आपले विचार व्यक्त करतांना प्रा शशिकला वंजारी यांनी सांगितले की, मन, बुद्धी आणि आत्मा यांचे संयुक्त मिश्रण आपल्याला साधायचे असेल तर योग महत्वाचा आहे. केवळ ज्ञान मिळविण्यासाठी योग अभ्यास नको, तर हे ज्ञान समाजापर्यंत पोहचवले तर त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. जिवनात कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी योगामुळे त्या दूर करता येऊ शकता, याकरीता आपल्या चित्त शुद्धीसाठी योग गरचेचा आहे असेही त्यांनी नमूद केले.
सध्याच्या काळात पालकांमध्ये आपल्या पाल्यांच्या भविष्य तथा त्यांच्या करिअरबाबत खूप अस्थिरता आहे. याकरीता आपल्या आसपासच्या पालकांना योग म्हणजे काय आणि त्याबाबत उद्बोधन करा असेही त्यांनी उपस्थित योग अभ्यासक व तज्ञांना आवाहन केले.
कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, या परिषदेचे वैशिष्ये असे की, प्रत्येकाने आपल्या अनुभवावर आधारीत वेगवेगळ्या विषयावर आपले सादरीकरण केले. त्यामुळे या परिषदेने ज्ञानात्मक स्थर वर नेऊन ठेवला आहे. सामान्य माणसाचे जिवन बदलून टाकण्यासाठी या परिषदेची नक्कीच उपयोग मदत होईल. योग हा एक सभ्य समाज निर्माण करणारा आहे, त्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू. तसेच पुढच्या योग परिषदेची आतापासूनच तयारी सूरू झाली आहे असेही त्यांनी शेवटी नमूद केले.
याप्रसंगी काही निवडक पेपर सादरीकरण करणाऱ्या योग अभ्यासकांना प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच निवडक सहभागींनी विद्यापीठाने परिषदेचे उत्कृष्ठ आयोजन केल्याबाबत आपल्या मनोगतात विद्यापीठाचे आभार मानले.
समारोपाच्या पुर्व संध्येला डॉ शंकर खेडकर यांचे क्युरेटिव्ह योगा या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी उपस्थितांनी आपल्या शंकांचे त्यांच्याकडून निरसर केले. त्यानंतर विद्यापीठाच्या दृकृश्राव्य केंद्रच्या स्टुडिओत संगिता पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थीतांसाठी नृत्य अविष्कार सादर करण्यात आला.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यापीठात असलेल्या क्युरेटिव्ह योगा सेंटरला परिषदेसाठी आलेल्या सर्वांनी भेट देऊन तेथील माहीती जाणून घेतली व प्रात्यक्षिके देखील बघितली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात डॉ टी एम श्रीनिवासन यांचे फिजिऑलॉजी ड्यू टू योगा रिसर्च या विषयावरील अतिशय अभ्यासपुर्ण ऑनलाईन व्याख्यान झाले.
परिषदेची काही वैशिष्ट्ये :
· परिषदेत पेपर सादरीकरणात काही उच्चपदस्थ शासकीय अधिकारी, तसेच गृहिनी, शेतकरी देखील सहभागी
· 70 ते 80 वयोगटातील काही जेष्ठ नागरीक यांनी देखील पेपर सादरीकरण केले
· योग संदर्भातील विविध विषयावर सर्वांनाच आकलन होईल असे पेपर सादरीकरण
· इस्त्रायल येथून दर्शना राजपूत यांचे ऑनलाईन पेपर सादरीकरण
· उत्तम दर्जाचे सादरीकरण
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभांगी पाटील यांनी केले, तर आभार संचालक तथा परिषदेचे आयोजक डॉ जयदीप निकम यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेचे संचालक, प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, या परिषदेमध्ये भारतभरातून जवळपास 200 च्या वर योग साधक व अभ्यासक प्रत्यक्ष, तसेच आभासी पद्धतीने सहभागी उपस्थीत होते.