संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात उद्या राष्ट्रीय कार्यशाळा
विषय – Internationalization of Higher Education: The Global Futures
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संगणकशास्त्र विभाग आणि यू.जी.सी. मालवीय मिशन टिचर ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान यांच्या सहकार्याने “Internationalization of Higher Education: The Global Futures” या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता विद्यापीठ परिसरातील दृकश्राव्य सभागृह (A.V. थिएटर) येथे होणार आहे.

उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अजय लाड, संचालक – नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ, यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे आणि संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहम्मद अतिक यांनी शिक्षक, विद्यार्थी व संशोधकांना या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. मोहम्मद अतिक यांच्याशी संपर्क साधावा, असे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.
