शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागात (CIAA-2024) राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
विकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा डॉ एस एच पवार
कोल्हापूर : खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीच्या सतत विस्तारणाऱ्या संशोधनाच्या क्षितिजावरील, लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (LIGO) हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुरुत्वाकर्ष्णाचे तरंग शोधण्यासाठी समर्पित प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे विश्वातील कृष्णविवरांच्या आणि न्युट्रॉन ताऱ्यांच्या टक्करांसारख्या महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करता येतो. या प्रगतीच्या अनुषंगाने, भौतिकशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, “खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील समकालीन समस्या-2024” (CIAA-2024) या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप समारंभ दिनांक 1५ सप्टेंबर 2024 रोजी शाहू सभागृह येथे प्रमुख पाहुणे, प्रा डॉ एस एच पवार, संचालक, सीआरटीडी, सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर, सन्माननीय अतिथी, प्रा डॉ एस मित्रा, आयुका, पुणे व प्रा डॉ आर जी सोनकवडे, अधिविभागप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
गुरुत्वाकर्षण लहरीच्या संशोधनातील एक महत्त्वाचा टप्यावरील प्रवास विशद करण्यासाठी CIAA-2024 ही कार्यशाळा LIGO दिनाच्या (१४ सप्टेंबर ) पार्श्वभूमीवर आयोजित केली होती. कार्यक्रमाची सुरुवात डॉ एस पी दास यांनी कार्यशाळेसंदर्भातील मागील तीन दिवसातील आढावा घेऊन कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर प्रा डॉ एस मित्रा यांनी मनोगतामद्ये तुमचे ध्येय शोधा, कष्टाला पर्याय नाही, संशोधनामध्ये मोठी ध्येय प्राप्त करण्यासाठी मेहनत करत राहण्याची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन केले. संशोधनामुळे आनंद मिळत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
यानंतर मंगेश सुतार व निधिशा या सहभागी संशोधकांनी कार्यशाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व पुन्हा अशा प्रकारच्या कार्यशाळा घेण्यासंदर्भात आवाहन केले. तसेच कार्यशाळाआयोजन केल्याबद्दल आभारत मानले. त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रा डॉ एस एच पवार यांनी अभियांत्रिकी दिनानिमित्त शुभेच्छा देऊनआपल्या मनोगताची सुरुवात केली. त्यांनी आयुका पुणे व कोल्हापूर यांचे नाते खूप जुनी आहेत तसेच जयंत नारळीकर यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला. आपण आनंत नारळीकर यांचे पहिले पी एच डी चे विद्यार्थी असल्याचेही नमूद केले. पुढे डॉ पवार यांनी आयुका स्थापने पाठीमागची भूमिका व इतिहास सांगितला. तसेच सदर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल प्रा सोनकवडे यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी ही हिग्स-बोसॉन पार्टिकल म्हणजे देवकणाबद्दल सविस्तर माहिती दिली. विकसित भारत 2047 चे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठीअशा प्रकारच्या कार्यशाळा गरजेच्या असल्याचे त्यांनी नमूद केले. संशोधन हे प्रामुख्याने शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी केल्यास विकसित भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली.
त्यानंतर झालेल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा डॉ सोनकवडे यांनी राज्य स्तरावरील शिकत असणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रतिभा असल्याचे सांगितले त्यांना फक्त योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे नमूद केले. अशा कार्यशाळांमधूनअशी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश होता असे स्पष्ट केले. ही कार्यशाळा म्हणजे खगोल शास्त्रातील नवीन सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले तसेच भविष्यातआयुकासोबत विविध योजना राबवणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. राजर्षी शाहू महाराज यांचे काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कोल्हापूर हे पहिलवानांच्या बरोबरच बुद्धिवंतांचेही शहर असल्याचे त्यांनी नमूद केले. विकसित भारत बनवायचा असेल तर निश्चित सर्वांनी पुढे येऊन स्वच्छ भारत, सुंदर भारत, तसेच विविधतेत एकता जपली पाहिजे असल्याचे सांगितले.
लिगो इंडिया हा भारतीय प्रकल्प महाराष्ट्रात होत असल्यामुळेआपण महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे ज्यामुळे देशाचे नाव जागतीक पातळीवर पोहोचले आहे. आइन्स्टाइनने गेल्या शतकात भाकीत केलेल्या गुरुत्वाकर्षण तरंग यांचे अस्तित्व या दशकात आपल्याला मिळाले. सदर कार्यशाळेमध्ये विविध वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होते त्यामध्ये कैवल्य शिंदे हा नववीचा विद्यार्थी सहभागी होता त्याचे विशेष कौतुक प्रा सोनकवडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ व्ही एस कुंभार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. साक्षी काळे आणि साधना परीट या विद्यार्थ्यांनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
CIAA-2024 कार्यशाळामध्ये देशभरातील विविध ३० नामांकित संस्थांमधून, त्यामध्ये बिट्स पिलानी, हैदराबाद, सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरत, भूपेंद्र नारायण मंडळ विद्यापीठ, मधेपुरा, बिहार, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची, झारखंड, बर्दवान विद्यापीठ, पश्चिम बंगाल, गुजरात विद्यापीठ, तिरुवरूर विद्यापीठ, तामिळनाडू यासह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, विलिंग्डन कॉलेज, सांगली, आर पी गोगटे कला आणि विज्ञान महाविद्यालय, रत्नागिरी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, शिवप्रसाद सदानंद जैस्वाल कॉलेज, गोंदिया, डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे, डॉ पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली, नूतन महाविद्यालय, सेलू, परभणी, पारुल विद्यापीठ, वडोदरा, केबीपी कॉलेज, वाशी, नवी मुंबई, डॉ विश्वनाथ कराड एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे, किसन वीर महाविद्यालय, वाई, फर्ग्युसन कॉलेज, पुणे राजाराम कॉलेज, कोल्हापूर, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा, महाराष्ट्र कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, मिरज महाविद्यालय, मिरज, दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर, १०० हून अधिक संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या प्रसंगी भौतिकशास्त्र अधिविभागातील प्रा डॉ के वाय राजपुरे, डॉ ए व्ही मोहोळकर, डॉ आर एस व्हटकर, डॉ एन एल तरवाळ, डॉ एम व्ही टाकळे, डॉ एम आर वाईकर, डॉ ए आर पाटील, डॉ एस एस पाटील, आर एन घोडपागे, जे अहंगर, आयआयजी, कोल्हापूर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.