मिल्लिया महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

लोकशाहीत मतदार हा जागृत असावा – डॉ. शेख गफूर

बीड : येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राज्यशास्त्र विभाग  व निवडणूक विभाग, तहसील कार्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 जानेवारी 2024 गुरूवार रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, मार्गदर्शक डॉ.शेख गफूर अहमद, उपप्राचार्य प्रोफेसर शौकततुल्ला हुसैनी, राज्यशास्त्रविभाग प्रमुख तथा निवडणूक साक्षरता मंचचे नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद खय्यूम फारुकी,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग, डॉ. शेख रफीक, प्राध्यापिका डॉ. शेख एजाज परवीन यांची उपस्थिती होती.

Advertisement

मार्गदर्शक डॉ. शेख गफूर यांनी लोकशाहीत मतदार हा जागृत असावा. तसेच भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाहीने आणि घटनेने दिलेला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार होय असे सांगितले. आपण 14 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत आहोत. जगातील सर्वात मोठी लोकशाही देशात आपण राहतो. लोकशाहीत जनता सरकार बनविते त्यासाठी मतदान करावे लागते. मतदारात जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. नागरिकाना सगळ्यात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदान करण्याचा अधिकार. जात-पात-धर्म या सगळ्या पलीकडे जाऊन राष्ट्रीयत्व महत्त्वाचे मानून प्रत्येकाने मतदान करणे हा त्याचा अधिकार आहे. कोणीही तुमच्यावर दबाव टाकून किंवा तुम्हाला कोणते आमिष दाखवून या अधिकाराचा गैरवापर करू शकत नाही. नवमतदार वोटर हेल्पलाईन (Voter Helpline) या ॲपद्वारे स्वतःही नाव नोंदणी करू शकतात असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ यांनी नवमतदाराने पुढाकार घेऊन आपले तसेच घरातील अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्याची नाव नोंदवावे. मतदान करून तुम्ही तुमच्या आवडीच्या उमेदवाराला निवडून आणू शकता. म्हणजेच लोकशाही शक्तीशाली करावयाची असेल तर सर्वानी मतदान करणे अनिवार्य आहे असे सांगितले. मतदार प्रतिज्ञा शपथ उपप्राचार्य डॉ.सय्यद हनीफ यानी दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग यानी तर आभार प्रदर्शन डॉ. शेख रफीक यानी केले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page