राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रीय एकता दिनाचे आयोजन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून गुरुवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली जाणार आहे.

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, RTMNU Nagpur

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे हे भूषविणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय एकता दिवसाच्या शपथेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. वरील कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com