महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे फळपिकांमधील जैविक व अजैविक ताण व्यवस्थापनासाठी जैव तंत्रज्ञानावर राष्ट्रीय प्रशिक्षण

फळपिकांवरील समस्या सोडविण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक – कुलगुरू डॉ. विलास खर्चे

राहुरी | Campuskatta News : फळपिकांवरील विविध समस्यांवर मात करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

ते विद्यापीठातील उद्यानविद्या विभागांतर्गत उद्यानविद्या (फळपिके) विभागाच्या वतीने आयोजित
“फळपिकांमध्ये जैविक व अजैविक ताण व्यवस्थापनासाठी जैवतंत्रज्ञान व पारंपारिक दृष्टिकोन”
या विषयावरील २१ दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

🎓 प्रमुख उपस्थिती

या कार्यक्रमास व्यासपीठावर

  • डॉ. गोरक्ष ससाणे – विस्तार शिक्षण संचालक
  • डॉ. विठ्ठल शिर्के – संशोधन संचालक
  • डॉ. साताप्पा खरबडे – अधिष्ठाता
  • डॉ. बी. टी. पाटील – विभाग प्रमुख व प्रशिक्षण कार्यक्रम संचालक
    यांची प्रमुख उपस्थिती होती.
National training on biotechnology for biotic and abiotic stress management in fruit crops at Mahatma Phule Agricultural University, Rahuri.

🌱 फळपिकांमध्ये जैवतंत्रज्ञानाची गरज – डॉ. विलास खर्चे

मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले की,
फळपिकांवर हवामान बदलाचा मोठा परिणाम जाणवत असून फळगळ, ताण व्यवस्थापन यासारख्या समस्या वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जैवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून फळपिकांमधील समस्या सोडवता येऊ शकतात.

ते पुढे म्हणाले की,
शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी फळपिकांचा मोठा वाटा आहे. भारतामध्ये सुमारे ३६९ दशलक्ष टन फळपिकांचे उत्पादन होत असून, देशाच्या कृषी विकासात फळपिकांचे योगदान महत्त्वाचे आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने डाळिंब पिकामध्ये
फुले भगवाफुले सुपर भगवा यांसारखे देशभर लागवडीत असलेले महत्त्वाचे वाण विकसित केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

📘 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व प्रशिक्षणाचे महत्त्व

डॉ. साताप्पा खरबडे यांनी सांगितले की,
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार अभ्यासक्रमात बदल करून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित करणे तसेच प्राध्यापकांचे ज्ञान अद्ययावत करणे यावर भर देण्यात येत आहे. यासाठी अशा राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमांची मोठी गरज आहे.

National training on biotechnology for biotic and abiotic stress management in fruit crops at Mahatma Phule Agricultural University, Rahuri.

🔬 प्रशिक्षणातून काय मिळणार?

डॉ. विठ्ठल शिर्के यांनी सांगितले की,
या प्रशिक्षणाद्वारे फळपिकांमधील जैविक व अजैविक ताण व्यवस्थापनासाठी जैवतंत्रज्ञानावर आधारित सखोल माहिती प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे.

डॉ. गोरक्ष ससाणे यांनी प्रशिक्षणार्थींना या कार्यक्रमातून जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.

🧪 २१ दिवसीय प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. बी. टी. पाटील यांनी प्रशिक्षणाची सविस्तर रुपरेषा मांडली.

या प्रशिक्षणामध्ये —

  • ५४ विविध विषयांवर व्याख्याने
  • ९ प्रात्यक्षिके
  • ४ अभ्यास दौरे
    यांचा समावेश आहे.

या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रासह सहा राज्यांमधून २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

🎤 समारोप

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
डॉ. ज्ञानेश्वर क्षिरसागर यांनी केले,
तर आभार प्रदर्शन
डॉ. जितेंद्र ढेमरे यांनी मानले.

यावेळी विद्यापीठातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com