एमजीएममध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

सातत्यपूर्ण मेहनतीने यशाला गवसणी घालता येते – आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक डॉ मकरंद जोशी

छत्रपती संभाजीनगर : आपण आपल्या ध्येयाशी समर्पित राहून खेळ खेळणे आवश्यक आहे. जिद्द, चिकाटी आणि सकारात्मकता जपत ध्येयाशी एकरूप राहून खेळत राहिलो तर एक दिवस आपल्याला नक्कीच यश मिळत असते. विशेषत: आपल्या खेळातील सातत्यपूर्ण मेहनतीने आपल्याला यशाला गवसणी घालता येते, असे प्रतिपादन जिम्नॅस्टिक खेळाचे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक डॉ मकरंद जोशी यांनी येथे केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून आंतर शालेय स्पर्धेचे उद्घाटन एमजीएम स्पोर्ट्स क्लब अँड स्टेडियम येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी, डॉ मकरंद जोशी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, संस्थेचे क्रीडा संचालक नितीन घोरपडे, विद्यापीठाचे क्रीडा प्रमुख प्रा डॉ दिनेश वंजारे, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ जोशी म्हणाले, खेळासाठी उत्तम क्रीडा सुविधा असणे आवश्यक असते. एमजीएम हा क्रीडा सुविधांनी पूरक असा परिसर आहे. येथे विद्यार्थ्यांना सर्व उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मेजर ध्यानचंद यांनी सराव करून आपल्या खेळाने आपली जगभर ओळख निर्माण केली. आपल्याकडे काय नाही याच्यापेक्षा आपल्याकडे काय आहे? याचा विचार करून आपला क्रीडा प्रवास केला तर आपण आपल्या यशस्वी होऊ.

Advertisement

खेळामध्ये गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आपला वैयक्तिक विकास करण्यासाठी खेळ आवश्यक आहे. खेळाच्या माध्यमातून आपले मानसिक आरोग्य व्यवस्थित राहून शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. आज या स्पर्धेत शहरातील विविध शाळांतील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेंतर्गत रायफल शूटिंग, स्विमिंग आणि चेस या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमधून आपल्याला शिकायला खूप गोष्टी मिळायला. खेळाला एमजीएम विद्यापीठाने अनन्यसाधारण महत्व दिले असून विद्यार्थ्यांना या माध्यमातून क्रेडिट दिले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून विद्यार्थ्यांनी येथे उपलब्ध असलेल्या सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना केले.

डॉ आशिष गाडेकर म्हणाले, आज आपण महान मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमित्त हा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल वाचले पाहिजे. विशेषत: त्यांच्या जीवनाकडून शिकत आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करायला हवी. ऑलिंपिकचे स्वप्न समोर ठेऊन आपण आपल्या देशासाठी काय योगदान देऊ शकतो, याचा विचार प्रत्येकांनी करायला हवा.

पोहण्याच्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर मान्यवरांनी रायफल शूटिंग आणि चेस स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी दाशरथे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक नितीन घोरपडे यांनी केले तर आभार प्रा डॉ दिनेश वंजारे यांनी मानले. यावेळी रायफल शूटिंग प्रशिक्षक गीता मस्के, चेस प्रशिक्षक विलास राजपूत, स्विमिंग प्रशिक्षक धनंजय फडके यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.

या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी डॉ शशिकांत सिंग, जॉय थॉमस, डॉ सदाशिव जव्हेरी, डॉ श्रीनिवास मोतीयेळे, रहीम खान, सागर शेवाळे व सर्व संबंधितांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page