गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिवस साजरा

विद्यार्थ्यांमध्ये खेळांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी विविध क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरी करण्यात येते. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या आदर्श पदवी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये खेळांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी विविध क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा सुदर्शन जानकी तर प्रमुख अथिती म्हणून प्रा प्रीती भांडेकर, प्रा राजेश्री परिहार महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना प्रा सुदर्शन जानकी यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगून प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त करून देशासाठी योगदान देण्याचे आव्हान केले.

Advertisement

प्रा प्रीती भांडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, मैदानी खेळातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात काय परिणाम होतो याविषयी माहिती दिली. तर प्रा राजश्री परीहार यांनी विद्यार्थ्यांना भारतासाठी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या खेळाडूंची विस्तृत माहिती देऊन राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विशद केले.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी बॅडमिंटन, क्रिकेट, कॅरम, 100 मीटर रनिंग, कबड्डी, खो – खो आदी खेळांचे आयोजन करण्यात आले. दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये सहभागी दर्शवला..

समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा डॉ कृष्णा कारू आणि प्रमुख अथिती म्हणून एम बी ए विभाग प्रमुख प्रा डॉ अतुल ढवरे होते..

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा डॉ कृष्णा कारू यांनी विद्यापीठा अंतर्गत सुरू असलेल्या विविध क्रीडा क्षेत्रातील सुविधांविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना खेळामध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले तर प्रमुख अतिथी प्रा.डॉ. अतुल ढवरे यांनी शिक्षण घेत असताना खेळाचे व्यवस्थापन कसे करायचे या संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे समन्वयक भरत घेर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले असून कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्रा गौतमी शहारे, प्रा रेणुका गव्हारे, प्रा प्राजक्ता घोटेकर, प्रा आश्विन आंबेकर, प्रा प्रवीण कांबळे, प्रा मंगेश कळते, प्रा अश्विनी केडमवार, प्रा प्राची इनकने, प्रा कौशिक घोटकर यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page