सौ के एस के महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
बीड : सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडा विभागात प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी क्रीडांगण या भित्तीपत्रक या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
तसेच यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांनी आपल्या महाविद्यालयास विद्यापीठाचा उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल महाविद्यालयातील खेळाडू व क्रीडा संचालक यांचे अभिनंदन केले व क्रीडा दिनाचे महत्व विशद केले.
या वेळी क्रीडा विभाग प्रमुख डॉ भागचंद सानप यांनी मेजर ध्यानचंद यांचे १९३६ बर्लिन ऑलम्पीक मधील हॉकी संघाच्या कामगिरीचे वर्णन करून महाविद्यालयातील खेळाडूंना आजच्या दिवसाचे क्रीडा दिनाचे महत्व विशद केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर कमवि उपप्राचार्य एन आर काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, पदव्युत्तर संचालक डॉ खान अन्सार उल्ला शफिउल्ला, तसेच क्रीडा विभाग प्रमुख डॉ भागचंद सानप, डॉ शेख शकील, डॉ ज्ञानेश्वर घोडके, डॉ प्रियंका नवले, प्रा अमृतसिंग बिसेन तसेच महाविद्यालयातील खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.