गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सहा. प्रा. डॉ. महेंद्र वर्धलवार, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद जावरे तसेच विभागातील एनएसएसचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेचा ऐतिहासिक आढावा सादर करून करण्यात आली. यानंतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना एनएसएसचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की एनएसएस हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना समाजसेवा, ग्रामीण विकास, आरोग्य जागरूकता, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच एनएसएस ही केवळ शैक्षणिक उपक्रम नसून तरुणाईला “Not Me But You” या ध्येयवाक्याच्या आधारे समाजहितासाठी कार्य करण्यास प्रेरित करणारी चळवळ असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

समारोप प्रसंगी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी निस्वार्थ समाजसेवा, शिस्तबद्ध जीवनशैली आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये सक्रिय योगदान देण्याची शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com