महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात ‘रामकथा’ वर राष्ट्रीय चर्चासत्र
रामकथेच्या माध्यमातून भारतीय समाजाची ओळख होते : प्रो. शुक्ल
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल म्हणाले की राम मर्यादा पुरुष आहेत. राम संस्कृती व भारतीयतेचे प्रतीक होत. रामकथेच्या माध्यमातून भारतीय समाजाची ओळख होते. प्रो. शुक्ल गुरुवार, 20 रोजी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय व अयोध्या शोध संस्थान, अयोध्या यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी साहित्य विभागा द्वारे ‘पश्चिमी भारतातील भाषांमध्ये रामकथा’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घघाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तुलसी भवनातील गालिब सभागृहात झाले. यावेळी बीज वक्ता म्हणून आवासीय लेखक प्रो. रामजी तिवारी, मुख्य अतिथी म्हणून अयोध्या शोध संस्थानचे निदेशक डॉ. लवकुश द्विवेदी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या हिंदी विभागातील प्रो. भारती गोरे, हिंदी साहित्य विभागाच्या अध्यक्ष प्रो. प्रीती सागर, साहित्य विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. अवधेश कुमार मंचावर उपस्थित होते.
प्रो. शुक्ल म्हणाले की विविध भारतीय भाषांमध्ये प्रयुक्त राम एकच आहेत. जन्मापासून मृत्यु पर्यंत राम सर्वत्र आहेत. भागवत परंपरेत राम केवळ लीलापुरुष व मर्यादापुरुष नसून सुव्यवस्थेचे राम आहेत. दंड देणारे राम व सामाजिक विद्रूपतेप्रती प्रतिक्रिया व्यक्त करणारे राम कथेच्या माध्यमातून मराठी भाषेत व्यक्त होतांना दिसतात. मध्य भारताचे हे क्षेत्र रामाच्या प्रतिज्ञेचे क्षेत्र आहे. राम भारतात आणि भारतीयांच्या मनात जीवंत आहेत. राम एक ऐतिहासिक व सांस्कृतिक तत्व आहेत.प्रो. रामजी तिवारी म्हणाले की मन, जन, कण-कणात राम व्याप्त आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान राज्यांमधील रामकथांचे त्यांनी विवेचन केले. त्यांनी राजस्थान मधील जैन वैष्णव परांपरेतील रामायण, भक्त, कवि आणि योद्धा माधवदास यांचे रामायण तसेच गुजरातेतील नरसिंह मेहता, भारत तिवारी, गिरधर, गगनभाई बसवाड़ा, योगेश्वर, गिरिजा शंकर आणि विजय पंडया यांच्या रामायणाचे उदाहरण प्रस्तुत केले.
महाराष्ट्रात सन् 1271 मध्ये रामायण लिहिले गेले. शैल्य अयाचित यांच्या रामायणाचा उल्लेख सापडतो. संत ज्ञानेश्वर, रामदेव, एकनाथ व समर्थ रामदास यांनी लिहिलेल्या पदांचा उल्लेख करत ते म्हणाले की रामकथेचे खरे स्वरूप संत एकनाथ यांच्या ‘भावार्थ रामायण’ ग्रंथात सापडते. महाराष्ट्रातील कवि ग. दि. माडगुळकर यांनी मराठीमध्ये गीत रामायण लिहिले आणि संगीतकार श्रीधर फडके यांनी ते स्वरबद्ध केले. लोक साहित्यात रामाचे वर्णन लेखिका सुनंदा पाटील यांनी केले आहे असेही ते म्हणाले.
डॉ. लवकुश द्विवेदी म्हणाले की रामकथा शोध लेखनाच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि साहित्याला बळकट करण्याची आवश्यकता आहे. विश्वविद्यालयासोबत झालेल्या कराराचा उल्लेख करत ते म्हणाले की हा सामंजस्य करार शैक्षणिक व सांस्कृतिक सुद्धा आहे. या अंतर्गत शोध, संरक्षण व प्रलेखीकरणाचे कार्य केले जाईल. अयोध्या शोध संस्थान ‘ग्लोबल इनसाक्लोपीडिया ऑफ रामायणा’ वर काम करत आहे असेही ते म्हणाले.
प्रो. भारती गोरे म्हणाल्या, संत एकनाथ यांनी धनुर्धारी रामाची कल्पना केली. 16वे शतकात समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडाचे होते ज्यात धनुष्यबाणाचा प्रयोग करणारे राम यांचे चित्रण केले गेले आहे. समर्थ रामदास यांनी युद्ध कांड व सुंदर कांड लिहिले. महाराष्ट्रातील समृद्ध रामकथा परंपरेवर त्यांनी विस्ताराने मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. अवधेश कुमार यांनी केले. स्वागत वक्तव्य हिंदी साहित्य विभागाच्या अध्यक्ष प्रो. प्रीती सागर यांनी केले. तुलनात्मक साहित्य विभागाचे अध्यक्ष डॉ. रामानुज अस्थाना यांनी संचालन केले तर हिंदी साहित्य विभागाचे एसोशिएट प्रोफेसर डॉ. उमेश कुमार सिंह यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्ज्वलनाने व आचार्य तुलसी यांच्या मूर्तीला माल्यार्पण करुन करण्यात आला. सहायक प्रोफेसर डॉ. तेजस्वी एच.आर. यांनी मंगलाचरण सादर केले. यावेळी अधिष्ठातागण, विभागाध्यक्ष, अध्यापक, शोधार्थी व विद्यार्थी मोठया संख्यने उपस्थित होते.