शिवाजी विद्यापीठामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्सवास प्रारंभ
कोल्हापूर : दि.26 फेब्रुवारी ते 02 मार्च, 2024 या दरम्यान शिवाजी विद्यापीठामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन 2024 उत्सव साजरा होत आहे. दि. 26/02/2024 रोजी कुलगुरू प्रा. डि. टि. शिर्के व प्र-कुलगुरू प्रा. पी. एस. पाटील यांचे शुभहस्ते उद्धाटन करून उत्सवास प्रारंभ झाला. उद्धाटन ़सत्राचे बीजभाषण प्रा. आर. एस. गाड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. एम. के. भानारकर यांनी केले आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रा. पी. के. गायकवाड यांनी केले.
कुलगुरू यांनी आपल्या भाषणात स्टार्ट अप जास्तीत जास्त भारतीय त़ंत्रज्ञान वापरून भारत विकसीत कसा होईल या संबधीत आपले विचार मांडलेत. प्र-कुलगुरू यांनी रमन इफेक्ट या बाबत सविस्तर मांडणी केली तसेच प्रा. गाड यांनी आकाश निळे का दिसते आणि कशामुळे दिसते यावर भाष्य केले. आय पी आर कक्षामार्फत भारतीय तंत्रज्ञान भारत कसा विकसित होईल. यासाठी प्रयत्न करावे असे मत मांडले. प्रा. गाड यांनी पहिल्या सत्रात भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, गणितशास्त्र, रसायनशास्त्र, जिवशास्त्र अशा वेगवेगळया विषयामध्ये भारतीय तंत्रज्ञान वापरून भारत विकसित होत आहे. यासाठी तरूणानी पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या उद्धाटनाला प्रा. डेळेकर, प्रा. कदम, प्रा. शिंदे, प्रा. भिलावे इ. उपस्थीत होते. पहिल्या सत्राचे अध्यक्ष स्थान प्रा. एम. पी. भिलावे यांनी भुषविले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगिता खबाले व स्वप्नाली पांगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एम. मस्के यांनी केले उद्धाटन प्रसंगी शिवाजी विद्यापीठामधील विभागप्रमुख, संचालक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.