सौ के एस के महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
बीड : 28 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे गेस्ट लेक्चर व बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांची उपस्थित होते. डॉ. हुसेनी एस. एस. उपप्राचार्य, विभागप्रमुख भौतिकशास्त्र मिलिया कॉलेज, बीड यांनी रोल ऑफ फिजीक्स फॉर डेव्हलपमेंट इन रिसेंट टेक्नॉलॉजी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानास विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान या थिम अंतर्गत भारतातील विविध टेक्नॉलॉजी ची माहिती दिली. विद्यार्थ्यांना पुढील समस्या व त्यांचे निराकरण कसे केले पाहिजे याचीही माहिती दिली. यावेळी डॉ. सतिश माऊलगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते विभागातर्फे तसेच सायन्स फोरम तर्फे आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरीत करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर , पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. सतिश माऊलगे, उपप्राचार्य नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर यांची उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमाचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रज्ञा महेशमाळकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रज्ञा महेशमाळकर, डॉ. प्रेमचंद सिरसट, प्रा. शिवाजी राऊत यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते.