डेक्कन कॉलेजमध्ये राष्ट्रिय संस्कृत दिनाचे ४ सप्टेंबर रोजी आयोजन
माजी कुलगुरू प्रा नितीन करमळकर यांचे राष्ट्रिय शैक्षणिक धोरण या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
पुणे : डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठाच्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या वतीने यावर्षीचा राष्ट्रिय संस्कृत दिन बुधवारी दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०४:०० वाजता साजरा करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व वक्ते – माजी कुलगुरू प्रा नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे असून त्यांचे राष्ट्रिय शैक्षणिक धोरण या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रा प्रमोद पांडे भूषविणार आहेत. याप्रसंगी विभागाचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू प्रा प्रसाद जोशी, विभाग प्रमुख, प्रमुख संपादक, संस्कृत आणि कोशशास्त्र विभाग, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठ, पुणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तरी या कार्यक्रमाचे सर्व संस्कृतानुरागींना हार्दिक निमंत्रण !
हा कार्यक्रम निःशुल्क असून सर्व वयोगटासाठी खुला आहे. सदर कार्यक्रमाच्या समन्वयिका संस्कृत विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ वृषाली भोसले आहेत.