एमजीएम विद्यापीठामध्ये राष्ट्रीय स्तरावरील आयडीई बुटकॅम्प यशस्वीपणे संपन्न
छ्त्रपती संभाजीनगर : केंद्रीय शिक्षण विभाग आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयडीई बुटकॅम्पचा सांगता समारंभ शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहात यशस्वीपणे संपन्न झाला. या पाच दिवसीय बूटकॅम्पमध्ये भारताच्या विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इनोवेशन, डिझाईन, आणि उद्योजकता या विषयांवरील विविध व्याख्याने या पाच दिवसांच्या बूटकॅम्पमध्ये वाधवाणी फाउंडेशनमधील तज्ञांद्वारे घेण्यात आली. या समारोप सत्रासाठी केंद्रीय शिक्षण विभागाचे उमेश राठोड, सौरभ निर्माले यांची उपस्थिती होती तर एमजीएम विद्यापीठाकडून कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, संचालक डॉ रनित किशोर, प्राध्यापक व सर्व संबंधित उपस्थित होते.
अशाप्रकारचे बुटकॅम्पचे भारतात ९ ठिकाणी एकाच वेळी आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्रातील एकूण महाविद्यालयांपैकी एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेट अँड रिसर्चची निवड या रहिवासी बुटकॅम्पसाठी केली गेली होती. बुटकॅम्पच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय शिक्षण विभागाच्या उमेश राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारे भांडवल कसे उभारावे तसेच गुंतवणूकदारांना आपल्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी कशाप्रकारे आकर्षित करावे, यासाठी एकूण ८३ टीम बनविण्यात आल्या होत्या. त्यांनी आपापल्या कल्पना ज्यूरीमेंबर्ससमोर सादर केल्या. औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना यावेळी महत्वपूर्ण सल्ले देऊन त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवल्या जातील, याबद्दल सविस्तरपणे माहिती दिली.
एकूण ८३ नविण्यातापूर्ण कल्पनांपैकी १० उत्कृष्ट कल्पनांना एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, संचालक डॉ रनित किशोर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे या पाच दिवसांच्या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्रे देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ भक्ती बनवसकर यांनी केले. प्रा डॉ घोसिया इमाम यांनी पाच दिवसीय कार्यक्रमाचा आढावा घेतला तर प्रा ऋषिकेश काकडे यांनी आभार प्रदर्शन केले.
सन्मानित करण्यात आलेले १० संघ खालीलप्रमाणे आहेत :
बेस्ट पिचर संघ आणि त्यांनी सादर केलेली थीम:
१. आयक्लिटिक्स टेक्नॉलॉजीस – लॉ इन्फोर्समेंट
२. प्रिंटहब : ४.३ आयओटी
३. संस्कार : ऍग्रीकल्चर
४. फिटमंत्रा : फिटनेस
५. टेरा स्पशीयल : स्पेस टेक
नोटेबल पिचर्स संघ आणि त्यांनी सादर केलेली थीम :
१. अलायन्स अल्गोरिथम : ऍग्रीकल्चर
२. सीटीसी सॅटेलाईट प्रोपल्शन : स्पेस टेक
३. बबल्स अँड स्किन्स : स्किन केयर
४. सेफ किड्स : अग्रीगेटर ऍप
५. अविन्या ऍग्री सोल्युशन्स प्रा.लि. : ऍग्रीकल्चर