सावंगी येथे राष्ट्रीय संविधान दिन साजरा, वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
वर्धा : दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या अभिमत विद्यापीठातील स्कूल ऑफ अलाईड सायन्सेस येथे राष्ट्रीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संविधानाच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून करण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांसाठी आपली निष्ठा आणि भारतीय नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली.
स्पर्धेत विविध अभ्यासक्रमांतील १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
- प्रथम क्रमांक: बीसीएच्या रोमा बाणिक
- द्वितीय क्रमांक: अनुष्का कुमारी
- तृतीय क्रमांक: एमबीएच्या शर्वरी पिपरे
पुरस्कार वितरण: विजेत्यांना सीडीओईचे संचालक डॉ. छितिज राज, वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र विभागाचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. पंकजकुमार अनवाडे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रभारी अधिष्ठाता प्रा. सुप्रिया नरड व डॉ. दीपक शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. संविधान दिनाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठे योगदान दिले.